महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उचला, उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन…
——————-
साईनाथ पतंगे
——————
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शाखा वसमत यांच्या वतीने बुधवार ता.६ उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कु. वेदवती ऋग्वेदी कुलकर्णी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
महासंघाच्या निवेदनानुसार, संबंधित घटनेमुळे समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा गंभीर स्वरूपाच्या घटनांवर तातडीने आणि कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे दोषींना लवकरात लवकर अटक करून न्यायालयीन प्रक्रिया गतीमान करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला असून समाजातील विविध घटकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तत्परतेने कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
निवेदनावर आनंद बडवणे, प्रकाश कहात, श्याम भाऊ माळवटकर, अभय आंबेकर, अनिल देशपांडे, कवठेकर, अविनाश गिरगावकर, मुकुंद मोहरीर, शामराव कुरुंदकर, भारती मडके, सुनिता पारवेकर, वर्षा मोहरीर, यासह महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


